spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोवाड येथील यूवा गौरक्षकांनी  दिले गोवंशला जीवनदान.

प्रशासनाने दखल घेण्याची मागणी
नरखेड 30 : स्थानिक नरखेड शनिवार बैल बाजारातून गोवंश खैरगाव मार्गाने जात असताना बसस्टॅन्ड जवळ दि.२८ जून शनिवार रोजी दुपारी १ वाजता ४ गौवंश अवैध पद्धतीने कत्तलखाना साठी घेऊन जात असताना संशयावरून मोवाड येथील युवा गौरक्षकानी विचारपूस केली असता. गौवंश छोटया पिकअप मध्ये  वाहतूक करताना आढळल्याने त्यांनी तत्काल नरखेड पोलीस स्टेशनलां महिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता हे गोंवश कत्तल खाण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेड येथे दर शनिवारी बैल बाजार भरत असतो. मध्यप्रदेश मधून गोवंश विक्रीच्या नावावर आणले जातात परंतु त्या गुरांना टॅग नव्हते. त्यामुळे ते अवैधरित्या कत्तल खाण्यासाठी नेताना त्यांच्यावर संशय आला.
मध्यप्रदेश राज्यामधून हे गोवंश  आणून नरखेड कुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीच्या नावाने आणतात. तिथे गेट पास काढतात आणि तिथे आणणारा व्यक्ती व्यापार करतात आणि विकले नाही म्हणून सांगतात आणि तो आणनारा व्यक्ती निघून जातो आणि गोवंश व्यापारी घेऊन जातो असा हा अवैध धंद्याचा प्रकार दर शनिवारी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
 कारण येथून बहुतांश गोवंश कत्तल खाण्यासाठी पाठवल्या जातात. यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी मोवाड येथील युवा गोरक्षक सुरज जिचकार, प्रवीण दुहीजोड, कार्तिक चौधरी, दर्शन कांबळे, सचिन बोरकर, अक्षय वानखेडे ,यश घोरसाडे, आदींनी केली आहे.

Popular Articles