काटोल :- काटोल पोलीसांना अवैध जुगाराबाबत मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पठार शिवर परिसरात अवैधरित्या ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर दोन ठिकाणी छापा टाकुन दुचाकी वाहने, ५२ ताशपत्ते व रोख रक्क्म असा एकुण १,८३,८५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाई के १ पठार शिवारात आरोपी १) नितेश जिवन कुमेरिया, रा.खानगाव, ता. काटोल २) योगेश राजेन्द्र खरोले, रा. पंचवटी, काटोल, ३) नामे धिरज विजय सिंग, रा. सरस्वती नगर, काटोल हे अवैधरित्या ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळतांना मिळुन आले. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन १) ०२ मोबाईल, २) मोपेड अॅक्टीव्हा क एम. एच ४० डी.ए ८०४५ कि ८५,०००/- रूपये ३) रोख रक्कम ३६००/- रूपये ४) ५२ तासपत्ते असा एकुण किंमती १,१७,६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई के २ पठार शिवारात रोड च्या कडेला आरोपी १) धम्मशीर पुरूषोत्तम गायकवाड रा. पेठबुधवार, काटोल, २) तन्मय राजकुमार चौधरी, रा. तळयाची पार, काटोल, ३) गोपी तायडे, रा. अण्णाभाऊ साठे नगर, काटोल हे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना मिळुन आले. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन १) मोबाईल २३,०००/- रूपये, २) डीस्कव्हर मो.सा क एम. एच ४० व्ही. ४१५६ कि ४०,०००/- रूपये ३) रोख रक्कम ३,२५०/- रूपये, आणि ४) ५२ तासपत्ते असा एकुण किंमती ६६,२५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही कारवाईत २ दुचाकी, रोख रक्कम ६,८५०/- रूपये आणि साहीत्य असा एकुण १,८३,८५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर नमुद आरोपीतांवर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.