सावनेर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू असा एकुण ८५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण ०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी रोशन राजू चिटटवार, वय ३६ वर्ष, रा. बसवार लेआउट सावनेर याचेवर गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत आरोपी प्रमोद अन्नाजी मुंदाफळे, वय ३७ वर्षे, रा. मालापुर, ता. नरखेड याचेवर १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आरोपी ज्ञानेश्वर रामदास करनाके, वय ३५ वर्षे, रा. करंभाड वार्ड नं. ३. तह पारशिवनी याचेवर १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी शंकर कवडु पारसे, वय ३३ वर्ष, रा. वार्ड क ४, बुटीबोरी, जि. नागपूर याचेवर १ गुन्हा नोंद आहे. अशा एकुण ०४ आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ४ गुन्हे दाखल केले आहे.