नागपूर :- दिनांक ३१/१२/२०२५ रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत पोलीस स्टेशन रामटेक, कुही, काटोल यांनी अवैधरित्या सट्टापट्टी खेळणाऱ्या तसेच ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकुन सटटापटट्टी साहित्य, ५२ ताशपत्ते व रोख रक्क्म असा एकुण २,७२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकुण ०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
पोलीस स्टेशन कुही अंतर्गत मौजा बाजार चौक कुही, मौजा चांपा मोहीते सावजी ढाबा, मौजा मांढळ येथे आरोपी क्र. १) नामदेव विश्वनाथ चाचरकर, वय ६० वर्ष, रा. वार्ड क ०६, बाजार चौक कुही २) महेंद्र गोविदराव काबळे, वय ५० वर्ष, रा. चांपा, वस्ती ता. उमरेड ३) कवडु यशवंत डहारे, वय ३२ वर्ष, रा. मांढळ. ता. कुही हे कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातून सट्टापट्टी साहित्य व नगदी १.४९५/- रूपये असा एकुण १,६१०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांचेवर प्रत्येक १ गुन्हा एकुण ३ गुन्हे नोंद करण्यात आले.
पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत महादुला येथे आरोपी नामे १) संजय उरकुडा धुर्वे, २) नागोराव गोमा इडपाची, ३) धनराज आसाराम भोस्कर ४) बालदंच भोस्कर, सर्व रा. महादुला, ता. रामटेक जि. नागपुर हे लोकांकडुन पैसे घेवुन ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आले.