spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

1 ला आकाश आनंद मुंबईत संघटन समीक्षा व प्रशिक्षण शिबिर घेणार

मुंबई १८ : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांचे  उत्तराधिकारी व बसपाचे राष्ट्रीय कोऑर्डीनेटर आकाश आनंद हे 31 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार असून महाराष्ट्र प्रदेश बसपाची संघटन समीक्षा घेऊन राज्यातील बसपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणार आहेत.
मुंबईच्या चर्चगेट जवळील के सी कॉलेज ऑडिटोरियम मध्ये दिवसभर होणाऱ्या संघटन समीक्षा व प्रशिक्षण शिबिराला आकाश आनंद सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यसभा खासदार व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजारामजी, प्रदेशाध्यक्ष एड सुनील डोंगरे, स्थानिक प्रदेश प्रभारी डॉ संतोष शिंदे, डॉ रामचंद्र जाधव प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिराला प्रदेश, झोन, जिल्हा, विधानसभा, सेक्टर स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Popular Articles