कोंढाळी :- पोलीस स्टेशन कोंढाळी अंतर्गत मौजा राठी लेआउट कोंढाळी येथे फिर्यादी गुलाब सदाशिवराव चन्ने वय ७० वर्ष, रा. राठी लेआउट कोंढाळी हे घराला कुलूप लावुन शेतात गेले होते. घरी परीत आल्यावर त्यांच्या घराला लावलेले कुलुप तुटलेले दिसलेले. अज्ञात आरोपीतांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याने सदर प्रकरणी कलम कलम ३३१ (३) ३०५ (अ), ६२ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद केला होता.
हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी सुरू केला. गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे दिनांक १९/०१/२०२६ रोजी १) अंश उर्फ अंशुल नितीन गजबे वय २४ वर्षे रा. दत्तात्रय नगर नागपूर २) आर्यन मदन मेश्राम वय २३ वर्षे, रा. ताजश्री नगर नागपूर यांना नागपुर येथुन ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्यांनी सद गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. या व्यतिरिक्त नमुद आरोपीतांनी कारंजा घाडगे जि. वर्धा येथे सुद्धा घरफोडी केल्याचे कबुली दिली.