नगपूर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात पर्यावरणास अपायकारक तसेच जिवीतास धोकादायक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध खालील प्रमाणे ०२ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोस्टे उमरेड उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, बौध्द विहार जवळ गांगापुर उमरेड येथे आरोपी संकेत सदाशिव सोनटक्के, वय ३० वर्ष, रा. बौध्द विहार जवळ, गांगापुर उमरेड हा आपले दुकानात नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे उमरेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचुन दुकानाची तसेच आरोपीकडे असलेल्या अॅक्टीव्हा मोटरसायकल क एम एच ४०/सी एन ६३४४ या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता गाडीच्या डोक्कीतून प्रतिबंधीत नायलॉन मांजा मिळुन आला आरोपीचे ताब्यातून १) ०३ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती २,२००/- रूपये २) अॅक्टीव्हा मोटरसायकल क. एम एच ४०/सी एन ६३४४ किंमती ५०,०००/- रूपये असा एकुण ५२,२००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मौदा : मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी शेख सोहेल शेख रशीद, वय २३ वर्ष, रा. पारडी नागपूर हा नायलॉन मांजा स्वतः जवळ बाळगुन गुमथळा शिवार येथील बाजारात विक्री करिता येणार आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचत कारवाई केली आणि आरोपीची पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी कडे असलेल्या प्लास्टीक चुंगडीमध्ये नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्क्रीमध्ये गुंडाळलेला मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून मोनोकाईंट कंपनीचा एकुण ०४ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ३,२००/- रूपये असा एकुण ३,२००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.
दोन्ही कारवाईत ०७ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ५४००/- रूपये २) अॅक्टीव्हा मोटरसायकल किंमती ५०,०००/- रूपये असा एकुण ५५,४००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद प्रकरणी आरोपीतांविरूध्द कलम १२५, २२३ भा. न्या. सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.