उमरेड : उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा कावरापेठ, उमरेड येथे महीला आरोपी ही आपले दुकानात प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे उमरेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीच्या दुकानाची पंचासमक्ष घरझडती घेतली असता नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेला मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून गोल्ड कंपनीचा एकुण ०६ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ६,०००/- रूपये असा एकुण ६,०००/-रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.
नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन उमरेड येथे ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोस्टे कळमेश्वर दिनांक ३०/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, वार्ड क. ११, मरडवार लेआउट ता. कळमेश्वर येथे सुभाष कृष्णराव कुबडे, वय ५१ वर्ष, रा. कळमेश्वर, वार्ड क ११, मरडवार लेआउट, ता. कळमेश्वर जि. नागपुर हा नायलॉन मांजा स्वतः जवळ बाळगुन बायपास रोडनी मंडलीक यांचे वेल्डींगच्या दुकानाजवळ विकी करिता येणार आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचत कारवाई केली आणि आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी कडे असलेल्या थैली मध्ये नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेला मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून एकुण ०५ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ६८००/- रूपये असा एकुण ६८००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.
नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १२५, २२३ भा.न्या. सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.