Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

दुचाकीने कोळसा चोरून नेताना ३ आरोपी पकडले तर ३ आरोपी पसार

– २०७० किलो कोळसा, चार दुचाकी सह १ लाख ५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.

कन्हान :- वेकोली कामठी खुली कोळसा खदान येथि ल कोळसा ७ दुचाकीने चोरून नेताना एम जी नगर तारसा रोड कन्हान ये़थे कन्हान पोलीसानी चार आरो पीना पकडले तर तीन आरोपी दुचाकीसह पळुन गेले. वेकोली सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून कन्हान पोली सानी सात आरोपी वर गुन्हा दाखल करून चार दुचाकी, २०७० किलो कोळसा अशा एकुण १ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

वेकोलि कोळसा खदान येथुन कोळसा चोरून एका दुचाकीवर पाच बो-या कोळसाची अवैद्य वाहतुक जोमाने सुरू असुन भरगच्छ शहरातील रस्त्याने बिन धास्त सुरू असल्याने शहरात या कोळसाच्या दुचाकी ने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नस ल्याने शुक्रवार (दि.२७) मार्च ला सकाळी ६.३० वाज ता एम जी नगर, तारसा रोड कन्हान येथे कन्हान पोली सानी वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथुन चोरी करून दुचाकीवर पाच बो-यात ५०० किलो कोळ श्याची अवैद्य वाहतुक करताना पकडले. यात आरोपी १) अनिल लक्ष्मणराव पहाडे वय ३९ वर्ष रा. टेकाडी २) अकुश राजकुमार कश्यप वय १८ वर्ष रा. खदान न.६, ३) शुभम माणिक सलामे वय २७ वर्ष रा. गोंडे गाव याना पकडले तर स्प्लेंडर एमएच ४० झेड ६२६१ चा चालक आरोपी ४) रिंकु रामसिधारे भारद्वाज वय ३३ वर्ष रा. खदान न.६ हा दुचाकी सोडुन पळुन गेला. तसेच इतर दोन मो.सा. क्र. ५) एमएच४० झेड ७९९२ चा चालक बनु इंद्रजित राजभर वय ३७ वर्ष रा. खदान न.६, ६) एमएच४०बीएम ५४३१ चा चालक अभिषेक भाऊराव भोयर वय २४ वर्ष रा. ढिवर मोहला रामनगर पिपरी- कन्हान हे दुचाकी घेऊन पळुन गेले. त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. कन्हान पोली सानी वेकोलि कामठी खुली खदान सुरक्षा रक्षक तुषार मिलींद गजभिये वय ३६ वर्ष रा. छत्रपती नगर कामठी ता. कामठी यांचे तक्रारीवरून १) हीरो एचएफ डिल क्स एमएच ४९ सीसी ६९०८ किमत ३०००० रू. २) स्प्लेन्डर एमएच ४० सीवाय ४१३२ किमत ३५००० रू. ३) बजाज प्लाटिना एमएच ४० एएन ८४९७ किमत १५००० रू. ४) स्प्लेंडर एमएच ४० झेड ६२६१ किम त १५००० रूपये आणि एकुण दगडी कोळसा २०७० किलो किमच अदाजे १०००० रू. असा एकुण १ लाख ५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून थानेदार वैजयंती मंडवधरे याच्या मार्गदर्शनात सहा ही आरोपी विरूध्द अप क्र. २२४/२६ कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com