spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

३६ नामनिर्देशन पत्रांची उचल

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडीसाठी नागपूर विभागीय आयुक्त यांनी निश्चित केल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

महापौर व उपमहापौर निवडीसाठी दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत विविध पक्षांकडून एकूण ३६ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून १८ अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून १० अर्ज, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून ४ अर्ज तर अपक्षांकडून ४ अर्जांची उचल करण्यात आली आहे.

नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील नगरसचिव यांच्या कक्षात स्वीकारण्यात येणार आहेत.

नामनिर्देशन अर्जासोबत आधार कार्ड, निवडणूक प्रमाणपत्राची सत्यप्रत, किंवा जमा केल्याची पोचपावती, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र अथवा ते उपलब्ध नसल्यास पडताळणी समितीकडे सादर केल्याची पोचपावती तसेच सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.