Tuesday, February 10, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या ४ आरोपींना अटक

– चोरीचा १ गुन्हा उघड

सावनेर :- सावनेर पोलीस रात्रगस्त करीत असतांना रात्री ०१:४० ते ०२:०० वाजता दरम्यान जनता लॉन समोर छिंदवाडा रोड, सावनेर येथे ६ ते ७ तरूण संशयास्पद रित्या झाडाझुडपात उभे दिसले, पोलीसांना पाहुन सर्व आरोपी पळुन जात असतांना पोलीसांनी शिताफिने चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना नाव पत्ता विचारले असता आरोपी कं १) सागर सुरेश बांबोडे, वय २१ वर्षे, रा. केळवद, २) साहील ज्ञानेश्वर सोमकुवर, वय २१ वर्षे, रा. फेटरी कळमेश्वर ३) गणेश राजू वाट, वय २२ वर्षे, रा वार्ड क ११, पारशीवनी, ४) शुभम सूधाकर ठाकरे, वय २६ वर्षे, रा. केळवद सावनेर असे नाव असल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी त्यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसांचा संशय बळावल्याने नमुद इसमांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताव्यात दोन चाकू रस्सा व लाल मिरची पावडर असे साहीत्य मिळुन आले. पोलीसांनी त्यांचे कडे कौशल्यपुर्ण विचारपुसस केली असता सर्व मिळुन सावनेर परीसरात लुटमार करण्याची योजना आखत असल्याचे सांगीतले सदर प्रकरणी वर नमुद आरोपी आणि त्यांचे साथीदार यांचेवर कलम ३१० (४) भा.न्या.सं सह कलम ४,२५ भारतीया हत्यार कायादा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलीसांनी आरोपींना अधिक विचारपुस केली असता नमुद आरोपींनी यापुर्वी सुध्दा पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक ०२/०२/२०२६ रोजी मौजा बोरूजवाडा, बायपास रोड सावनेर येथे जबरीने पैसे आणि मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. नमुद प्रकरणी पोलीस स्टेशन सावनेर येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंद आहे. नमुद टोळीच्या सदस्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांचेवर पोलीस स्टेशन केळवद, कळमेश्वर, सावनेर आणि पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपुर शहर येथे विनयभंग, चोरी, रात्री अस्तित्व लपवुन फिरणे, जबरी चोरी असे ८ गंभीर गुन्हे नोंद आहे.

नमुद ४ आरोपीतांना अटक करण्यात आली. मा. न्यायालयाने आरोपींचा दिनांक ११/०२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे. पोलीसांनी पंचासमक्ष अॅक्टीव्हा मोपेड क एम एच ४९ बी वाय ०४७० किंमती ४०,०००/- रूपये, दोन चाकू रस्सा व लाल मिरची पावडर जप्त केले आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com