– धानाचे बोरे आणि चारचाकी पिकअप वाहनासह ७ लाख ०३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई
कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथका ने धान चोरी गुन्हा उघडीस आणुन चार आरोपींना ताब्यात घेऊन कारवाईत धानाचे बोरे आणि चारचाकी पिकअप वाहनासह ७ लाख ०३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले.
फिर्यादी श्राजेश आनंदराव चरडे वय ४५ वर्ष रा. निलज यांचा शेतात धानाची लागवड होती. त्यांचा शेतातुन ६७ बोऱ्या धान निघाला. रविवार (दि.४) जाने वारी पासुन बोरे शिलाई मारुन शेतात ठेवले. बुधवार (दि.७) जानेवारी रोजी रात्री १० वाजता ते गुरुवार (दि.८) जानेवारी रोजी सकाळी ६:३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी १६ धानाचे बोरे चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी श्राजेश चरडे यांचे तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.![]()
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करि त असतांना सीसीटीवी फुटेज, गुप्त बातमीदाराच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला. आरोपी देवानंद गणपत तिरबुढे वय ३२ वर्षे, रोहित रमेश तिरबुढे वय २२ वर्षे, मुकेश कुसाराम बावणे वय २८ वर्ष तीनही रा. धानला व निखिल ओमप्रकाश बोंदरे वय २६ वर्ष, रा. मौदा यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे कन्हान, मौदा, अरोली, कामठी शहर हद्दीत गुन्हा केल्याचे कबुल केले . पथकाने आरोपींच्या ताब्यातुन धानाचे एकुण ६९ बोरे किंमत १,७२,५०० रुपये, बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ४० बी एल ६५५३ किंमत ५,००,००० रुपये , तीन अँनराॅईड मोबाईल किंमत ३०,००० रुपये, नगदी ९५० रुपये असा एकुण ७,०३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीची मेडिकल तपासणी करून पुढी ल तपासकामी कन्हान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सपोनि किशोर शेरकी, एएसआई विनोद काळे, पोहवा प्रमोद भोयर, पोना संजय बरोडिया, पो शि आशुतोष लांजेवार, सायबर सेलचे पोना सतिश राठोड, पोशि मृणाल राऊत आदीनी ही कारवाई यश स्विरित्या पार पाडली.