उमरेड :- हदद्दीतील अवैध रेती तस्कर तसेच अवैध दारू काढणारे / विकी करणारे अशा एकुण ४ आरोपीतांना नागपुर ग्रामीण व जिल्हयातुन हद्दपार केले आहे.
सराईत गुन्हेगार नामे १) शेख गफ्फार इलाही शेख, वय. ५० वर्ष, रा. डिव्ही पब्लीक स्कुलजवळ, हसनबाग, नागपुर २) राहुल रमेश खैरवार, वय २८ वर्ष, रा. सेनापती नगर, दिघोरी घाट, उमरेड रोड, नागपुर यांच्या वर अवैध रित्या विनापरवाना रेती चोरीचे गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी असे गुन्हे करण्याच्या सवयीचे असुन ते असे गुन्हे करून शासनाचा महसुल बुडवतात. तसेच आरोपी के ३) आनंद अमृत पाटील, वय ५० वर्षे, रा बेसुर, ता. भिवापुर, जि. नागपुर आणि आरोपी कं ४) कमला सुरेश शिंदेकर, वय ६४ वर्षे, रा. इतवारी पेठ, उमरेड यांचेवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपींच्या गुन्हेगारी क्त्यामुळे परीसारातील अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. पोलीसांनी आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी कारवाई करून त्यांचेवर गुन्हे नोंद केले तसेच त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे.