Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार व सोमवार (ता.8व9) शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 35,600 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 12 प्रकरणाची नोंद करून 4,800 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 9,500 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/ टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली.हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे,चोक झाल्यावर घाण पसरवणे,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 1,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत संजय नरड यांनी अनधिकृत भूखंडावर सी अँड डी कचरा टकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. मधुर कॅटरर्स आणि मे. आठवले क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. गिता स्टील जनरल स्टोअर्स यांनी अनधिकृत जागी दुकानाचा कचरा टाकल्याने रू.5,000दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. सरस टयुशन क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सुदर्शन किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अचिव्हरर्स कोचिंग क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com