Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 51 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.गुरूवार(ता.22) शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 31,200 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 9,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबाध्टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वैयक्तीक /सार्वजनिक कार्यक्रमाचे उरलेले अन्न किंवा व्यवसायिकाद्वारे उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.सोनल रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. मिनाक्षी डोसा शॉप यांनी रस्त्यालगत उरलेले अन्न टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. चैतन्य-3 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. अमन कुबानानी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. चीनुझ्‍ किचन यांनी रस्त्यालगत स्वयंपाकघरातील कचरा टाकल्याने व कचरा टाकल्याची पावती नसल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राधे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com