Tuesday, February 24, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

५२ पत्त्यांचा जुगार; ५ जणांवर गुन्हा नोंद

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, काली माता मंदिर शिरपूर भुयारी जवळ मोकळ्या जागेत. काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) बंठी रमेश चुटे, वय ३५ वर्षे, २) विलास नानाजी तळेकर, वय ४१ वर्षे, ३) सजंय वामनराव मेहर, वय ३० वर्षे, ४) संकेत कन्होजीया जागंडे, वय ३० वर्षे, ५) लक्ष्मींकात उर्फ बाळू प्रभाकर मोटघरे, यांना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते आणि रोख रक्कम ९५२/- रूपये असा एकुण ९५२/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद ०५ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com