Friday, February 20, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैधरित्या विनापरवाना दारू निर्मिती, विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध ६ गुन्हे दाखल

नागपुर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू काढणारे, बाळगुन विकी तसेच सेवन करणाऱ्यांवर छापा टाकुन मोहाफुल दारू, देशी दारू असा एकुण २१५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपी नामे मनोज शंकर नागपुरे, वय ३५ वर्ष, रा. ब्राम्हणी उमरेड याचे वर १ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी महीला आरोपीवर वर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी क्र. १) नामे पंकज मुकुंदा पोटभरे, वय ३८ वर्ष, रा. स्नेहनगर मौदा ता. मौदा २) महिला आरोपी यांचेवर प्रत्येकी १ गुन्हा, पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे प्रकाश बाबुराव मेश्राम, वय ५८ वर्षे, रा. सावरगाव, ता. नरखेड याचेवर गुन्हा नोंद पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे जयराम पालसिंग राठोड, वय ४३ वर्ष, रा. माहुरखोरा याचेवर १ गुन्हा नोंद आहे. अशा आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ६ गुन्हे दाखल केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com