spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 62 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर, ता. २०  : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.  मंगळवार (ता.19)  रोजी शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 50,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 30 प्रकरणांची नोंद करून 12,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रू. 400/- चे दंड वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस  प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 16,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे धुवून परिसर अस्वच्छ केल्यास (रू.1000) या प्रमाणे 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000/- दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु. 7,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. व्यंक्टेश हॉस्पीटल यांनी रस्त्याच्या कडेला मोठा खडडा खोदल्याने ज्यामुळे दुर्गंधी आणि डास पसरत असल्यामुळे रू.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत सी.ए.करूटकर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. गणेश किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. महालक्ष्मी बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. विशाल किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अचिव्हर्स लर्निंग सेंटर यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू.5,000/-दंड वसुल करण्यात आले.मंगळवारी झोन अंतर्गत सुनील मखीजा यांनी बोरवेलची माती व चिखल रस्त्यावर टाकल्यामुळे रू.5,000/-दंड वसुल केला.उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.

Popular Articles