किशोर साहू :मौदा, ता. 30: दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील सांड व भागी या दोन नद्यांच्या श्रीक्षेत्र संगम चाचेर येथे सार्वजनिक ऋषी पंचमी महिला उत्सव समितीतर्फे ऋषिपंचमीनिमित्त गुरुवार (दि. 28) ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करून थाटात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने संपूर्ण चाचेर नगरी स्वागतद्वाराने सजवण्यात आलेली होती व चौकाचौकात शुभेच्छांचे फलकही लावण्यात आलेले होते.
गुरुवार सकाळी नागद्वारच्या भक्तगणांमार्फत महाआरती, ह भ प कु. दिपाली आसटकर यांचे कीर्तन, लगेच दुपारला श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा , विविध भजन मंडळाचे भजन संमेलन व इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या समारोप महाप्रसादाने करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारे, राष्ट्रीय सचिव निशा खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.आयोजकांतर्फे त्यांच्या शाल, त्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक नवदुर्गा महिला भजन मंडळाचे पदाधिकारी तुळसा अढाऊ, छाया कुल्लरकर ,सुनंदा वानखेडे, ज्योत्सना साखरवाडे, वनश्री टेंभरे ,सोनू अढाऊ, जयश्री वानखेडे, रंजना वानखेडे, शालू हूड सह रेवा अढाऊ, विष्णू टेंभरे ,शिवशंकर साखरवाडे, सुरेंद्र टेंभरे, दिलीप घाटे, संजय अढावू, रवींद्र वानखेडे, राजेश बावनकुळे,आश्विन वानखेडे,चरणदास बावनकुळे सह गावातील व परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.


