मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने कारले गेले पाण्याखाली शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

0
47

अमरदिप बडगे, तिरोडा ३० :-  तालुक्यात मेघगर्जनेसह गरजेनुसार मुसळधार पावसाने हजेरी लावली होती .भाजीपाला पिकांचे  शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील शेतकरी विक्रम डोंगरवार यांनी आपल्या शेतामध्ये अर्ध्या एकरमध्ये कारल्याची लागवड केली होती. 28 ऑगस्टला झालेल्या जोरदार मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे कारल्याचे वेली  जमिनीवर पडले असून पाण्याखाली आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे‌ कारल्या पिकाचे जवळपास  वीस हजारापर्यंत नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सबंधित कारल्या लागवड केलेली पिके पाण्यात खाली आल्याने संबंधित कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतावर  जाऊन पाहणी करून पंचनामा केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.