तिरोडा 1 :- तालुक्यातील खोडगाव येथील शेतामधील विद्युत तारेच्या स्पर्शाने एक युवक ठार तर पती व पत्नी असे दोन जखमी झाल्याची घटना काल सकाळच्या दरम्यान घडली आहे. मृतक युवकाचे नाव शिवचरण पटले वय 42वर्ष असे आहे.
मिळाल्यामाहितीनुसार खोडगाव येथील निवासी धुरण पटले वय 55 वर्ष व त्याची पत्नी द्वारका धुरण पटले वय वर्ष 48 हे दोघेही काल सकाळी साडेदहाच्या दरम्यान शेतामध्ये गेले होते. दरम्यान वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात विद्युत तारेमध्ये वीज प्रवाह सोडला होता .परंतु पती-पत्नीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान शेजारच्या शेतातील शिवचरण पटले या युवकाने त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु तो देखील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने विद्युत प्रवाहाने शिवचरण पटलेच्या जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नी यांना उपचारासाठी तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने तिला गोंदिया येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये घडविण्यात आले. शिवचरणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.



