पिपंरीया येथील गुरुदेव महिला भजन मंडळ करते समाजप्रबोधन कार्य

0
52

तिरोडा 1 :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर वैनंगगां नदी काटावर वसलेले पिपंरीया गावात पंधरा वर्षा पासुन सतत परिसरात, व तालुक्यात लागूनच मध्यप्रदेश मध्ये भजनाच्या माध्यमातून समजप्रोधानाचे कार्य करीत असून युवा पीढी जनजागृती करताना दिसून येत आहे. समाजातील युवा पिढी असो किंवा गावातील नागरिकांना भजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य भजन मंडळ करित आहे . चांदोरी खुर्द येथे बाल गणेश उत्सव मंडळ च्या ठिकाणी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी महिला मंडळाच्या संचालिका लिलावती शुक्ला यांनी आपल्या संपूर्ण चमू सह , पहिले नमन गणपती चें, समजावून व बेटी पडावं बेटी बचावं, झाडें लावा झाडें जगवा, स्वच्छता, पर्यावरण, देशप्रेम, यारवर उपस्थित नांगरिकांना भजन च्या माध्यमातून नवीन पिढीला जन जागृत केले. आजचा युवा पिढी आपली  संस्कृती, संस्कार, सामाजिक बांदीलकी विसरू लागली आहे,यासाठी समाजात जनजागृती आवश्यक असलाचे संगितले .मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य जनजागृती चें कार्य करीत आहे.