खात येथे महालक्ष्मीची स्थापना

0
60
किशोर साहू: मौदा, ता. १: घरोघरी गणरायाच्या आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी आणि त्या नंतर होते ते गौरी आवाहन. गौरीपूजन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचे व्रत आहे. जेष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आप आपल्या परंपरेनुसार पूजन होते. यंदा भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात 31 ऑगस्ट रोजी गौरी आवाहन करण्यात आल. त्यानुसार मौदा तालुक्यातील विविध गावात आज महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली. खात येथेही मागील 111 (एक शे अकरा)वर्षापासून लीलाधर शामराव कुर्वे यांच्याकडेही आज महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली.