इत्तर मागास बहुजन विभाग गडचिरोली यांच्या वतीने 31 ऑगष्ट भटके विमुक्त दिवस मोठया उत्साहात साजरा

0
52

विमुक्त भटके जातीनी सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा- सहाय्यक संचालक डॉ.सचिन मडावी यांचे आवाहन

गडचिरोली दि. ३  :-  दिनांक 31 आगष्ट 2025 रोज रविवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इत्तर मागास बहुजन कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने  भटके विमुक्त दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय विमुक्त घुमंत जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यवान मेश्राम, अध्यक्ष ढिवर भोई, केवट व तत्सम जाती संघटना गडचिरोली, सुरेश मांडवगडे, सचिव, राष्ट्रीय विमुक्त घुमंत जिल्हा शाखा गडचिरोली, उंकन्टजी राऊत, सहकोषाध्यक्ष, राष्ट्रीय विमुक्त घुमंत जिल्हा शाखा महासंघ गडचिरोली, विनोद साळवे कोषध्यक्ष राष्ट्रीय विमुक्त घुमंत जिल्हा शाखा महासंघ गडचिरोली, मीनाक्षीताई गेडाम, महिला अध्यक्ष ढिवर, भोई संघटना गडचिरोली, सत्कार मूर्ती कमलसिंग चितोडिया यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर मंडळीनी उपस्थिताना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ सचिन मडावी साहेब यांनी उपस्थित विमुक्त भटके जातींना आपला सर्वांगीण विकास करायचं असेल तर शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे मार्मिक आव्हान केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विमुक्त जाती जमाती समाज बांधव तथा विजाभज आश्रम शाळेचे कर्मचारी, जिल्हा ढिवर भोई समाज संघटनेचे सचिव किशोर बावणे, सल्लागार राजेंद्र मेश्राम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज लांजे तर आभार शंकरवार सर यांनी केले.