किशोर साहू :मौदा, ता.८ : सध्या मौदा तालुक्यात, तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायत चाचेर व अरोली येथील ग्रामसभेत नागरिकांनी दोन्ही गावांच्या महिला सरपंचांवर केलेल्या अनियमिततेच्या आरोपांची चर्चा तालुक्यातील सर्व गावागावात व सोशल मीडियावर सुरू आहे . अनियमितेचे आरोप होताच चाचेर ग्रामपंचायतीच्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी चाचेर गावातील विकास कामात पोषक अश्या मुख्य रस्त्यालगत लावलेल्या भूमिगत नाल्याच्या पायल्या काढून टाकले असून, पूर्वीप्रमाणेच आता सांडपाणी खड्ड्या- खड्ड्यांमध्ये साचलेले व मुख्य रस्त्यावर वाहताना दिसत आहे, यावरून जणू काही चाचेर येथे आता झालेले विकास काम उधळून आता विनाश काम होताना दिसत आहे. याउलट जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेची एकाच वर्षात पटसंख्या 25 ने वाढवून व शाळेत शिक्षकाची ग्रामपंचायत मार्फत नियुक्ती करून नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर ग्रामसभेत अनियमिततेचे आरोप होताच व दररोज आरोपांवर – आरोपाचे सत्र सुरू असतानांही नदी काठावर ग्रीन जिम या विकास कामाचे उद्घाटन करून अनियमिततेच्या आरोपांची चौकशीत जे काही निष्पन्न व्हायचे ते होईल ,मात्र अरोलीत विकासाची गंगा सतत वाहणाराच असे संकेत त्या देत आहेत.
Home Latest News ग्रामसभेत अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर चाचेर येथे विनाशकामाला सुरुवात तर अरोली येथे विकासकामे...


