नागपूर :– गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने रात्रगस्तीदरम्यान तपासणी करताना मध्यप्रदेशातील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला. दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपूरा येथील हैदर गेस्ट हाऊसवर छापा टाकला असता दोन संशयित इसम आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे अफरोज उर्फ बिजली सलीम खान (वय २०, रा. शिवनी, मध्यप्रदेश) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी सांगितली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी शिवनी जिल्ह्यातील कान्हीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. अफरोजने गुन्ह्यातील मुद्देमाल आपल्या राहत्या घराजवळील मोकळ्या मैदानातील गवतामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तेथून सोन्या-चांदीचे दागिने, एकूण किंमत सुमारे ७ लाख रुपये, असा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मध्यप्रदेशातील कान्हीवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राहुल शिरे, नापोअं. शेषराव राऊत, अश्विन मांगे, समीर शेख आणि कुणाल मसराम यांनी केली.
Home Latest News नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील घरफोडी प्रकरण उघड, ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने...



