spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुन्हेशाखा युनिट ५ ची कामगिरी – घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक, दोन गुन्ह्यांचा छडा

नागपूर :- अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा गुन्हेशाखा युनिट क्रमांक ५ च्या पथकाने लावला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जवळपास २ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान बालाजी नगर विस्तारातील प्लॉट क्रमांक २४४ येथील घरात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि DVR असा सुमारे ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपास आणि खात्रीशीर माहितीनुसार गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाने मोहम्मद फैजाज एजाज अन्सारी (२३, पारडी) आणि अफरोज शमशाद अन्सारी (२३, पारडी) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून अजनीतील घरफोडीव्यतिरिक्त नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या वाहन चोरीचाही उलगडा झाला.

आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि आयफोन असा एकूण २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक ५ चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.