spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने 1 ऑक्टोबरला आरक्षण अंमल मेळाव्याचे आयोजन

नागपूर :- आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांच्या नेतृत्वाखाली पत्र परिषद घेण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, येणारा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने आरक्षण अंमल मेळाव्याचे आयोजन टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर च्या सभागृहात १ ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, उद्घाटन चंद्रकांत सोनवणे, प्रमुख पाहुणे कृष्णा बेडसे, उद्धव तायडे, दशरथ कांबळे, विकास काटे, प्रा. संध्या रायठक, मंगला बिहारे, डॉ. आशा पारधे, नामदेवराव निकोसे, प्रा. सुधा जनबंधू, राधाबाई पाटील, धर्माजी बागडे, देवेंद्र बागडे हे उपस्थित राहतील. या मेळाव्याचे आयोजक प्रा. रमेश दुपारे सुखदेवराव मेश्राम, राजू पांजरे, प्रकाश कांबळे, जयदेव चिवंडे, बबलू कडवे, शालिक बांगर हे राहणार आहे. मेळाव्यात राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या प्रणित महिला मोर्चा, युवा मोर्चा, विद्यार्थी मोर्चा, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी राहणार असल्याची माहिती बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Popular Articles