– तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा
नागपूर :- महावितरण,महापारेषण, महानिर्मिती विज क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या खाजगीकरण विरूध्द व एकतर्फी कर्मचारी पुनर्रचना तसेच कंत्राटी कामगारांना कायम सेवेमध्ये समाविष्ठ करावे व ईतर मागण्या करीता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समिती ने विविध स्वरूपाचे आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहे. तसेच दि. 9 आक्टोबर 2025 ला एक दिवशीय संप सुध्दा जाहीर केला आहे. या विविध टप्यातील आंदोलनामध्ये संघटना सकीय सहभाग नोंदवेल तसेच तिन्ही कंपनीतील कार्यरत कंत्राटी कामगारांच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे. या आंदोलनात राज्यातील कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राजाध्यक्ष प्रभाकर लहाने, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, नितिन चव्हाण, अनिल चव्हाण, शेख राहिल, शंकर जारकड, अतुल पाटील, प्रताप खंडारे, धिरज घायवट, अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मयुर कोठे, निलेश चक्रपाणी, निशांत काळसर्पे, मंगेश चिमोटे यांनी केली आहे.








