नागपूर :- स्नेह सोशल फोरमच्या १२ वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाची बैठक यशस्वीपणे पार पडली. बैठकीत मंगळवारी ७ ऑक्टोबर ला जवाहर विद्यार्थी गृह सिविल लाईन नागपूर येथे सायंकाळी ६ वाजता. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. संस्थांमध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, सी.ए, प्राध्यापक व विविध मान्यवर सभासद आहे. कार्यक्रमात नि:शुल्क आरोग्य शिबिर, संगीत व गायन सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्ती व दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली. तसेच 12 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी स्नेही सोशल फोरम डॉ. शंकरराव लांजेवार, डॉ.प्रवीण आष्टणकर, डॉ. निखिल भुते, अरुण घुसे, अरविंद झाडे, एकनाथ भुरे, मुरलीधर जयपुरकर, रमण लांजेवार, दीप्ती उराडे, शोभा भुरे, डॉ. नरेंद्र मरघडे, मनोर हेडाऊ, प्रदीप माटे, अशोक कावळे व इतर मान्यवर आणि संस्थेचे सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.








