नागपूर :- ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 27 सप्टेंबर रोजी श्री संत गजानन महाराज देवस्थान, तिर्थक्षेत्र शेगाव दर्शनासाठी प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्रा यांचे मार्गदर्शनाखाली सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीमध्ये 30 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहल यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, सचिव वसंतराव इझनकर, उपाध्यक्ष गणपत निंबाळकर, रमेश जिल्हारे, रामदास माहुरे यांनी अथक परिश्रम घेतले. सहल यशस्वी करण्यासाठी रोहन शुक्ला व रोशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








