spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाल संरक्षण यंत्रणांचे कायदे व भूमिका विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत, महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे कायदे व बाल संरक्षण यंत्रणांची भूमिका या विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

ही कार्यशाळा महिला व बाल विकास भवन, जिल्हा परिषद यवतमाळ येथील सभागृहात सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शन विशाल जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ यांनी केले. प्रशिक्षणामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्रात डॉ. सिद्धार्थ गंगाळे सेंट्रल युनिव्हर्सिटी, हैदराबाद यांनी ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अरुण कांबळे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा,पॉक्सो कायदा, बाल कामगार प्रतिबंध अधिनियम, बाल न्याय अधिनियम, तसेच गाव बाल संरक्षण समितीचे कार्य व जबाबदाऱ्या यांवर मोलाचे मार्गदर्शन केले.अर्चना माळवे, परिविक्षा अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा POSH कायदा व POSH समितीच्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत विधाले (बाल विकास प्रकल्प अधिकारी – नागरी), तसेच UNICEF चे प्रतिनिधी डॉ. राजलक्ष्मी नायर आणि डॉ. सुबोध गुप्ता यांनी हजेरी लावली. त्यांनी पोषण माह याबाबत मार्गदर्शन करत अंगणवाडी पर्यवेक्षकांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे संचालन माधुरी पावडे यांनी तर आभार प्रदर्शन कोमल नंदपटेल यांनी केले. या कार्यक्रमास एन. आर. परांडे, बापूसाहेब चिंचाणे, गजानन जुमळे जिल्हा परिविक्षा अधिकारी, रवींद्र गजभिये, देवेंद्र राजूरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, प्रशांत गावंडे (विस्तार अधिकारी), तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्प लाईनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles