spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ढाकारा फाटा जवळ गंभीर अपघात

खापा :- खापा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ढाकारा फाट्याजवळ रविवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान गंभीर अपघात झाला अपघात इतका गंभीर होता की दोन्ही तरुण जागेवर मरण पावले. विक्रम साय उईके वय २८ वर्ष रा. पिपरढाणा,जि. छिंदवाड़ा मध्यप्रदेश, रोहित एमांसा उईके वय २२ वर्ष रा. बरातमारी जि. छिंदवाड़ा मध्यप्रदेश असे अपघातात मृत झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विक्रम आणि रोहित हे कोथुरना शिवारातील दफई फाटाजवळ असलेल्या मॅगनीज प्रॉडक्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे काम करीत होते. दोघेही दुचाकी क्रमांक एम पी 28 एम टी ०५४४…ने खापा येथे आठवडी बाजाराला आले होते. ट्रक क्रमांक एम एच 40 बी एल ६४१९हा उमरेड माईन येथून कन्हान, पारशिवणी, खापा, सावनेर मार्गे इंदौर मध्यप्रदेश येथे कोळसा घेऊन जात होता. यादरम्यान विक्रम आणि रोहित सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान खापावरून परत येत असताना ढकारा फाटा येथील वळणावर अतिशय वेगाने असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि ट्रकच्या उजव्या बाजूला टायर खाली जाऊन धडकले. धडक इतकी जोरदार होती की घटनास्थळावरच दोघेही दोघांचा मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांनी खापा पोलीस स्टेशन व हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात श्याम सोलंकी, प्रकाश नांदुरकर संजय दशमवार यांनी घटनास्थळावर त्वरित पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने सावनेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले आणि शव विच्छेदनासाठी शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आले. बातमी लिहे पर्यंत खापा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात खापा पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.