– रावण वध सोहळ्याला चिमुकल्यासह नागरीकांची अलोट गर्दी
– पोलीस दलाचा तगळा बंदोबस्त
सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- प्रभु श्रीरामाच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र रामनगरीत म्हणजेच रामटेक नगरीत ‘ रावण वध ‘ हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहराला लागुनच असलेल्या मानापुर येथील डिगी मैदानावर सदर सोहळ्याचे थाटात पार पडला. यावेळी परीसरातील चिमुकल्यांपासुन नागरीकांची अलोट गर्दी केली होती.
प्रभु श्रीरामाने रावणावर याच दिवशी विजय मिळवुन त्याचा वध केला होता. तो हाच विजयदशमीचा दिवस असुन या दिवशी प्रख्यात रामनगरीत ‘ रावण वध ‘ हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवन काळाविषयी देशात जे महत्त्वपूर्ण स्थळे आहेत त्यांच्यापैकीच रामटेक हे एक अनन्यसाधारण महत्त्व असलेले स्थळ आहे. प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरी रामटेक येथे दरवर्षी विजयादशमी दसरा हा सण अनेक वर्षापासुन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. दरम्यान शहराला लागुनच असलेल्या मानापुर येथील डिगी मैदानावर रावण वध या सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात येते. यावेळी पोलीस प्रशाषणाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन कडेकोट बंदोबस्त लावलेला होता. कटघऱ्याच्या आतमध्ये या प्रसंगी रामटेक चे उपविभागीय अधिकारी ( महसुल ) प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, रामटेकचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम, नगर परीषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते. वरीलपैकी काही अधिकारी तर हा अलौकीक सोहळा पहाण्यास आपल्या परिवारासह उपस्थित होते. दरम्यान गांधी चौक-डिगी मैदान मार्गाने काही तरुण मंडळींनी दानपट्टा व तलवारबाजी प्रस्तुत केली. सायंकाळचा ५ वाजताच्या सुमारास श्रीराम गडमंदीरावरून तेथील पुजारीगण हे आपल्या इतर पुजारींसह गडावरील ” निशान ” घेऊन निघाले. यावेळी भोसला देवस्थान गडमंदीर चे निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांच्या सुरक्षा जवानांचा व पोलीस प्रशाषणाचा कडेकोट बंदोबस्त होता. दरम्यान साडेपाच वाजताच्या सुमारास गडमंदीरावरील पुजारी निशान घेऊन डिगी मैदानावर पोहोचले व जय श्रीराम चा जयघोष करीत रावणाचा म्हणजेच रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा वध केला. यावेळी हजर असलेल्या हजारो नागरिकांनी एका सुरात ‘ जय श्रीराम ‘ चा जयघोष केला. तेव्हा यावेळी संपुर्ण परीसर जय श्रीराम च्या जयघोषाने दुमदुमुन गेलेला होता.
संर्पूण भारत देशामध्ये दोन ठिकानी रावन वध
संपूर्ण देशात अयोध्या आणि रामटेक या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनलीलेशी संबंधित दोन ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन न करता त्याचा वध केला जातो. या दृष्टीने रामटेक येथील दसरा उत्सव विशेष ठरतो. मानापुर येथील डिगी मैदानावर रावण वध प्रसंगी उपस्थितांमध्ये माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागीय अधिकारी ( महसुल ) प्रियेश महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रमेश कोळपे, न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत, पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांचेसह हजारो नागरिक उपस्थित होते.








