spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

– आरक्षणाने “कही खुशी-कही गम” 

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन व नगर परिषद मुख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या उपस्थितीत शहिद नागेश्वर जिड्डेवार भवनात जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रभागातील ५० टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुक शर्यतीतून बाहेर पडले आहेत. नव्याने जाहीर झालेल्या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाल्याने शहरातील अनेक दिग्गजांना चांगला कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर गटा-तटाने आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी होणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी मतदाररुपी जनता उत्सुक आहेत. सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करून नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे. सोडतीमधून काहींना दिलासा तर काहींचे आरक्षणामुळे अवसान गळाले आहे. पांढरकवडा शहरातील अनेक प्रभागात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात गट-तट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेरबदल हे अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय आणि गटा-तटाचा समतोल साधत निवडणूक लढावी लागणार असल्याची चिन्हे आतापासून दिसत आहे.

नगरपरिषदेच्या एकूण जागांपैकी तब्बल ५० टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. येत्या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व एका जागेने तरी जादा असणार आहे. यावेळी प्रभागात महिलांना संधी जास्त मिळणार आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या महिलांना आणि निवडणुकीसाठी आर्थिक रसद पुरवणाऱ्या इच्छुकांना यावेळी स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग संख्या ११, नगरसेवक संख्या २२ 

नगराध्यक्ष पद : सर्वसाधारण राखीव *प्रभाग १* : अ) अनुसूचित जमाती ST (महिला) ब) सर्वसाधारण *प्रभाग २* : अ) नामाप्र OBC (महिला) ब) सर्वसाधारण *प्रभाग ३* : अ) नामाप्र OBC ब) सर्वसाधारण (महिला) *प्रभाग ४* : अ) नामाप्र OBC (महिला) ब) सर्वसाधारण *प्रभाग ५* : अ) नामाप्र OBC ब) सर्वसाधारण (महिला) *प्रभाग ६* : अ) अनुसूचित जाती SC ब) सर्वसाधारण (महिला) *प्रभाग ७* : अ) नामाप्र OBC (महिला) ब) सर्वसाधारण *प्रभाग ८* : अ) अनुसूचित जाती SC (महिला) ब) सर्वसाधारण *प्रभाग ९* : अ) अनुसूचित जमाती ST ब) सर्वसाधारण (महिला) *प्रभाग १०* : अ) नामाप्र OBC ब) सर्वसाधारण (महिला) *प्रभाग ११* : अ) अनुसूचित जमाती ST (महिला) ब सर्वसाधारण

Popular Articles