spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे ५ नव्या ई-लायब्ररी होणार सुरू

– जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३२ कोटींची तरतूद

नागपूर :- शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ५ नव्या ई-लायब्ररीचे कार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी मनपाने मोठे पाऊल उचलले आहे. येत्या काळात नव्याने सुरु होणाऱ्या ई लायब्ररी या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. याकरिता एकूण ३२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्त्वात शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या आणि दर्जेदार ई लायब्ररीची सुविधा मिळावी याकरिता अतिरिक्त ई-ग्रंथालय सुरु करण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकातर्फे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबर शहरातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमांसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी याकरीता ई-ग्रंथालय, वाचनालय आणि अध्ययन कक्ष चालविले जात आहे. मनपातर्फे सध्या ९ ई-लायब्ररी संचालित होत आहेत. यामध्ये स्मार्ट सिटी ई-लायब्ररी ३, मनपा कर्मचारी द्वारा संचालित ४ आणि स्वयंसेवी संस्था/महिला बचत गटाद्वारे संचालित २ आहेत. याशिवाय शहरात एकूण २९ वाचनालय आहेत. यामध्ये १३ मनपा कर्मचारी द्वारे संचालित तर १६ संस्था/महिला बचत गटाद्वारे संचालित आहे.

गेल्या ५० वर्षात महानगरपालिकेने वाचक वर्ग आणि शालेय विद्यार्थ्यांपासून बँक, रेल्वे, एसएससी, एमपीएससी, वनसेवा पीएसआय आणि यूपीएससीची, अभियांत्रिकी सेवा, अशा विविध स्पर्धा परीक्षांची व्याप्ती, स्वरुप लक्षात घेता विद्यार्थ्यांना कमी खर्चात तयारी करता यावी आणि परीक्षांचा सराव करण्याकरीता शहरातील विविध ठिकाणी ई-लायब्ररी तयार करण्यात आली आहे..

Popular Articles