spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्विमिंग पुल मध्ये शाॅक लागुन तरुणाचा मृत्यु

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट ते जुनी कामठी रोड वरील राज फार्म हाउस येथे स्विमिंग पुलात शाॅक लागुन ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन स्विमिंग पूल मध्ये सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा समोर आला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार ते रविवार (दि.१२) ऑक्टोंबर ला रात्री १२ वाजता दरम्यान मृतक मयुर सुधाकर मांडवगडे वय ३३ वर्ष रा. रुक्मिणी नगर हुडकेश्वर, नागपुर हा आपल्या मित्र शुभम सुरेंद्र राघौंरे वय ३० वर्ष रा. विनायक नगर, हुडकेश्वर, नागपुर याचा सोबत मैत्रीणीच्या वाढदिवसा ची पार्टी करिता राज फार्म हाउस जुनी कामठी येथे आले होते. काही वेळाने मृतक मयुर मांडवगडे हा स्विमिंग पुल मध्ये पोहण्याकरिता उतरला असता पाण्यात करंट लागला आणि तो पाण्यात आढवा पडला. त्याचा नाका, तोडांत पाणी गेल्याने त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, उपनिरीक्षक एकनाथ राठोड स्टाॅपसह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आले . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी शुभम राघौंरे याचा तक्रारीवरून मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Popular Articles