रामटेक तालुका पंचायत समिती आरक्षण

0
42

सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- रामटेक तालुका पंचायत समितीच्या निवडणुक १० जागांसाथी गणनिहाय आरक्षणाची सोडत (दि.१३) तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. सोडत कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार महेश कुलदीवार आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी एक वाजता सुरू झाली. पारदर्शक पद्धतीने लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर रामटेक तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष व उमेदवार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

गणनिहाय आरक्षण 

१) वंडाम्बा गण :- अनुसूचित जाती (सर्वसाधारण)

२) पथरई गण:-अनुसूचित जमाती (महिला)

३) बोथिया पालोरा गण:- अनुसूचित जमाती (महिला)

४) उमरी गण:- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)

५) भंडारबोडी गण:- सर्वसाधारण (महिला)

६) सोनेघाट गण:- सर्वसाधारण (महिला)

७) कांद्री गण:- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)

८) मनसर गण:- अनुसूचित जाती (सर्वसाधारण)

९) शितलवाडी गण:- सर्वसाधारण

१०) नगरधन गण:- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)