किशोर साहू मौदा, ०८ : अश्वघोष कला व सांस्कृतिक मंच वर्धा द्वारा आयोजित, लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त, स्मृतीशेष श्रीकांत जांभुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा -2025, नुकतेच बजाज सार्वजनिक वाचनालय वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर येथील सविता ताकसांडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्धा येथील मुन्ना नाखले यांनी भूषविले. डॉ. मिलिंद सवाई, प्राध्यापक राजेश डंभारे, प्राध्यापक ज्ञानेन्द्र मुनेश्वर, पद्मा तायडे, प्रशांत जारोडे, मोहन शेवडे, भंते राजरत्न, राजू थुल, शाहील दरणे, कार्यक्रमाचे आयोजक धनंजय नाखले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. याप्रसंगी स्पर्धेतील सहभागी मौदा व रामटेक तालुक्याच्या सीमेवर स्थित रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार – माझ्या दहा भाषणा एवढी ताकद, शाहिरांच्या एका गाण्यांमध्ये असते. कारण- आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे, वादळ रोखतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे, गीत उत्कृष्टरित्या सादर केले. त्यामुळे त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते.
भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धत सहभागी प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या जाहीर सत्कार








