यवतमाळ :- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम तसेच प्रेरणा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन. दीपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती डॉ. रवि पाटील, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश देठे, अध्यक्ष, वनराई विकास संस्था व बालरोगतज्ञ मंगाम यांची होती
प्रमुख वक्ते डॉ. सरफराज सौदागर, मानसोपचार तज्ञ, यवतमाळ यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मानसिक आरोग्य सेवांचा आरोग्य केंद्र सुरु केले असलयाचे जिल्ह्यातील ६६ सार्वजनिक आरोग्य केंद्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा स्पष्ट केल्या.
दाभाडे यांनी समाजातील मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व सांगितले. अशा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.डॉ. रवि पाटील यांनी मानसिक आजारांची लक्षणे व कारणे स्पष्ट केली. प्रकाश देठे यांनी मानसिक आरोग्य टिकविण्यासाठीचे उपाय सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सरफराज सौदागर यांनी केले.




