spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सूर नदीचा पात्रात बुडून इसमाचा मृत्यू

– खंडाळा शिवारातील घटना

– मासे व खेकडे पकडणे जीवावर बेतले

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- सूर नदी पात्रात मासे व खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा शिवारात मंगळवार (ता. २८) ला घडली असून बुधवार (ता.२९) सकाळी उघडकिस आली. धनराज तुलसीदास मोहनकार रा. स्वामी विवेकानंद वार्ड, रामटेक असे मृताचे नाव आहे.

धनराज नेहमी प्रमाणे मंगळवार (ता.२८) ला सकाळी घरातून मासे व खेकडे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडला. आणि त्याचा तो छंद होता. खंडाळा शिवारातील सूर नदीचा काठी आला. धनराज मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांच्या शोध घेत असतांना खंडाळा शिवारातील सूर नदीचा पत्राच्या काठी त्यांची सायकल उभी असल्याचे कुटुंबियांना दिसली. त्यांनी नदीच्या पात्रात शोधा-शोध घेण्यास सुरुवात केली असता काही अंतरावर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. कुटुंबीयांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. खेकडे पकडताना पाय घसरून ते खोल पाण्यात पडले आणि बुडाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.