नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मनपा, नागपूर स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने व घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत शनिवारी (ता.१) मनपाच्या दहाही झोनमध्ये विविध ठिकाणी ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शहरातील दहा झोनमधील विविध ठिकाणी नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

या अभियानाअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील राहुल नगर उर्वेला कॉलोनी, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १२ मधील गंगा नगर मार्केट, हनुमान नगर झोन मधील प्रभाग क्रमांक ३१ मधील शिव बिरहा जुनी शुक्रवारी, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक १७ मधील भुरा मैदान हाजरी स्टँड, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक २६ मधील विरंगुळा केंद्र दर्शन कॉलोनी, गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १८ मधील काशीबाई देऊळ, सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक २१ चाळीस संडास, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक २५ मधील भवानी मंदिर मारवल गेट ते शांती ट्रेडर्स, आशीनगर झोन मधील प्रभाग ७ मधील आवळे बाबू चौक, मंगळवारी झोन मधील प्रभाग १० सीआयडी नाला जवळ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. अभियानात सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजार परिसर आणि आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली.




