नगरपरिषद निवडणूकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधुन शुभम वरगंटवार प्रभावी युवा चेहरा

0
54

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- शुभम वरगंटवार हे भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून त्यांनी पूर्वी विद्यार्थी चळवळीत नगरमंत्री अध्यक्ष पद भोगवून असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या व सामाजिक कार्य असो किंवा समाजात सक्रिय सहभाग विविध प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने त्यांनी दिलेले आहे पक्षातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे व प्रभागात मोठ्या संख्येने शिवजयंतीचे आयोजन त्यांनी केलेले होते विविध महापुरुष जयंती व पुण्यतिथीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून सामाजिक काम करत असताना, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ही राजकीय व्यवस्थेच्या हाती असते. म्हणून निवडणुकीत पहिल्यांदा आपले नशीब आजमावणार आहे जनतेशी असलेला त्यांचा जवळचा संबंध आणि प्रामाणिकपणा मुळे लोक त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहे.. या तरुण चेहऱ्यामुळे निवडणुकीला नव्या उमेदीचा आणि विचाराचा रंग मिळणार आहेत. नव्या पिढीचा युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख दिवसेंदिवस मजबूत होतांना दिसत आहे.