किशोर साहू, मौदा, ता.४:- ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) अंतर्गत येत असलेल्या हिवरा गावांतर्गत विविध विकास कामे भूमिगत नाली,सिमेंट रस्ते यांचे निवेदन देण्यासाठी शनिवार (दिनांक १ नोव्हेंबर) ला हिवरा येथील नागरिकांनी माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांची त्यांच्या चाचेर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली आणि कामे सांगून निवेदन देण्यात दिले.
याप्रसंगी गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) येथील उपसरपंच मोतीराम घरझाडे, ग्रामपंचायत येसंबा उपसरपंच धनराज हारोडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे , महामंत्री कैलास सोमनाथे,अंकुश बुराडे, अतुल कानेटकर,मधुकर वाडीये ,प्रमोद फुले,नरेश मेश्राम, सुभाष साकुनकर,शुभम कुथे,अरुण मेश्राम ,आकाश श्रिरसागर उपस्थित होते.




