संत सुदर्शन गुरू नानक हे समतेचे पुरस्कर्ते होते – जयदेव चिंवडे 

0
62

नागपूर :- भारत देशात संतांच्या विचारधारेने समता बंधुता भाईचारा विचारसरणीने आकार दिला यांच्या मुळेच हजारो वर्षांपासून या देशात लहान मोठे सर्व हातात हात घेऊन जगत आहेत हे फक्त संतांच्या वाणी मुळे संत सुदर्शन, गुरू नानक हे खरे समतेचे पुरस्कर्ते त्यांच्या विचारांना कधीच बगल देऊ नका असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील नेते जयदेव चिंवडे यांनी केले ते आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या कार्यालयात संत सुदर्शन महाराज, गुरू नानक यांची संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी संतांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले तर राजु दादा पांजरे यांनी दिपप्रज्वलन केले प्रास्ताविक मामासाहेब मेश्राम यांनी केले सुत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.