तिरथ येटरे यांची सालेकसा नगर पंचायत निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

0
47

गोंदिया :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या गोंदिया जिल्हा संघटनेचे महासचिव तिरथ येटरे यांची सालेकसा नगर पंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविकांत खुशाल बोपचे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि सालेकसा नगर पंचायत क्षेत्रात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी येटरे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध कार्य होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.

येटरे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी . तिरथ येटरे यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.