सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे वर्ग दहावी वर्ष २००० चे माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी स्नेह मिलन सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. गुरुजनांचे शिष्यांनी सत्कार करून त्यांच्यावरील कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संवाद झाला. जुन्या आठवणी, वर्गातील किस्से आणि शाळेतील ते दिवस पुन्हा अनुभवताना सर्वांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू दिसून आले. माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा अनुभव सांगताना, शालेय शिक्षणानेच जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, छायाचित्र सत्र व मैत्रीचा जल्लोषाचा आनंद घेतला. या रौप्यमहोत्सवी स्नेह मिलनाने गुरु-शिष्य नात्याचे पावित्र्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अनेकांनी शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा अनुभव सांगताना, शालेय शिक्षणानेच जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ तसेच विद्यालय व्यवस्थापनाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राचार्य चन्ने सर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.








