नागपूर :- दिनांक १/१२/२०२५ ला नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने आपली बस मधील कामगारांना व त्यांच्या पाल्यांना काय काय सुविधा उपलब्ध आहेत याबाबत कामगार कल्याण अधिकारी सहाय्यक कल्याण आयुक्त डॉ.प्रतिभा भाकरे यांनी कामगार कल्याण मंडळामध्ये चालणारे कार्यक्रम व योजना व उपक्रम यांची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती संघटनेला देण्यात आली. याप्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी सहाय्यक लेखा अधिकारी किशोर मेश्राम व सचिन वंजारी केंद्र संचालक कामगार कल्याण यांच्याशी संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे महासचिव कमलेश वानखेडे तसेच निलेश पवनीकर. चेतना नाकतोडे, स्नेहा बोरकर,विशाल राऊत, विनोद सोनटक्के, ललित बावणे, विकी चौधरी उपस्थित होते.
आपली बस मधील कामगारांना व त्यांच्या पाल्यांना काय काय सुविधा उपलब्ध आहेत याबाबत कामगार कल्याण मंडळामध्ये चालणारे कार्यक्रम व योजना व उपक्रम यांची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती संघटनेला देण्यात आली


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



