spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक प.पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॅा. नीलम गो-हे, मंत्री मंडळ व विधिमंडळातील सदस्य यांनीही स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे व्यवस्थाप्रमुख व ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री, तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

Popular Articles