spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी निवेदना वर चर्चा न करता सभागृहात निघून गेले !

नागपूर :- आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेच्या वतीने आज दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री महोदयांना निषेधेचा ईमेल पाठविला होता. नंतर त्यांनी पोलीस बुथ वरून चर्चा करण्यासाठी निमंत्रित केल्या गेले लगेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. दशरथ भांडे आणि अध्यक्ष श्याम सोनकुसळे यांनी चर्चा करण्यासाठी विधिमंडळ गाठले. आदिवासीमंत्री यांच्या केबिनमध्ये बसून ठेवलेत. आदिवासी मंत्र्यांनी अध्यक्ष श्याम सोनकुसळेंना दोन शब्दात बोलले की , आता मला वेळ नाही , मी सभागृहात जातो आहे. परंतु निवेदनावर चर्चा न ते सभागृहात निघून गेले. म्हणून आम्ही सर्व आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेचे पदाधिकारी त्यांचा निषेध करतो. असे श्याम सोनकुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles